चित्रकला कधीपासून सुरु करायची Girish Chaudhary, November 28, 2023 चित्रकला कधीपासून सुरु करायची यावर मोठ्या चित्रकाराची विविध विचार, मत आहे. कला मग ती कोणतीही असो, भावना व्यक्त करण्यासाठीचे माध्यम आहे. आपण गाणी गाणारी, नाच करणारी लहान मुले टी. व्ही शो मध्ये बघतो ना मग चित्रकलेला वय कशाला ? माझ्या मुलीला आम्ही १५ महिन्यांची असतानां, हो बरोबर वाचले ” १५ महिन्यांची ” हळद, कुंकू पाण्यात टाकून रंग तयार केले व एका मोठ्या कागद रंगवायला दिला . तिने तिच्या वयाप्रमाणे वेडेवाकडे फटकारे मारले. दोन्ही हात रंगात बुडवून बोटांनी कागद रंगवीला. हे सर्व करतांना तिच्या चेहऱ्यावर नवीन काहीतरी करण्याचा आनंद होता. आपण मोठे सुध्दा आनंदासाठीच चित्रकला करतो की, आपण मोठे असल्याने विशिष्ठ आकार, रंग, माध्यम याचे नाव संबोध करून चित्र काढतो एवढेच. यामुळे मला असे वाटते की चित्रकलेला वय, वेळ, काळ, माध्यम असे काही बंधन घालू नये. प्रसिध्द कवी रवींद्रनाथ टागोर यांनी वयाच्या ६० व्या वर्षी चित्र काढण्यास सुरुवात केली. आजही अनेक डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ चित्र काढायला सुरुवात केलेले आपणांस पाहायला मिळतील. Children ChildrenPainting
रंगभरण पुस्तके (Colouring book) November 2, 2023November 10, 2023 लहान मुलांना भेटवस्तू किंवा वाढदिवसाला हमखास भेट मिळालेले एक पुस्तक म्हणजे रंगभरण पुस्तक. यामध्ये कार्टून,… Read More
Portrait & Landscape (पोट्रेट व लँड्स्केप) October 13, 2023October 30, 2023 माझे एकदा समूह चित्रप्रदर्शन भरले होते. मी व माझे सहकारी मित्र प्रदर्शनच्या खोलीमध्ये चित्रांविषयी चर्चा… Read More
हा खूप भारी चित्र काढतो, एकदम हुबेहूब October 17, 2023October 30, 2023 हे वाक्य अनेक पालक अनेकदा मुलासमोर म्हणतांना दिसतात . यात पालकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे… Read More