रंगभरण पुस्तके (Colouring book) Girish Chaudhary, November 2, 2023November 10, 2023 लहान मुलांना भेटवस्तू किंवा वाढदिवसाला हमखास भेट मिळालेले एक पुस्तक म्हणजे रंगभरण पुस्तक. यामध्ये कार्टून, प्राणी अथवा लहान मुलांच्या सिनेमातील स्पायडर मॅन सारखी चित्रे छापलेली असतात . त्याच पानात लहान आकारात रंगीत चित्र असते. मग काय मुले पाहून छान चित्र रंगवतात . मुलांचे पालक जसे च्या तसे चित्र पाहून खूष. मात्र याकडे पालकांनी डोळसपणे पाहणे आवश्यक आहे . मुलांना सहजरित्या मिळालेला चित्राचा विषय, आकार, रंगसंगती यामधून आनंद तर नाहीच पण काही शिकायला सुध्दा नाही मिळाले . मुलांची बोटे विकसित होत असतात , एखाद्या आकारात रंग भरताना तो बाहेर जाणे लहान वयात स्वाभाविक आहे. त्यांना मोठ्या आकारात चित्रे काढायला आवडतात . या पुस्तकांमुळे ते बांधून राहतात. त्यांना चित्राचा आनंद खूप कमी मिळतो . मुलांना भिंतीवर मोठा कागद चिटकवून द्यावा किंवा बाथरूम मध्ये टाईल्स वर जलरंग करण्यास सांगावे . बघा त्यानां हे आवडेल . प्रयोग करून पहा . Children Books
चित्रकला कधीपासून सुरु करायची November 28, 2023 चित्रकला कधीपासून सुरु करायची यावर मोठ्या चित्रकाराची विविध विचार, मत आहे. कला मग ती कोणतीही… Read More
हा खूप भारी चित्र काढतो, एकदम हुबेहूब October 17, 2023October 30, 2023 हे वाक्य अनेक पालक अनेकदा मुलासमोर म्हणतांना दिसतात . यात पालकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे… Read More
Portrait & Landscape (पोट्रेट व लँड्स्केप) October 13, 2023October 30, 2023 माझे एकदा समूह चित्रप्रदर्शन भरले होते. मी व माझे सहकारी मित्र प्रदर्शनच्या खोलीमध्ये चित्रांविषयी चर्चा… Read More