जलरंग – वेगवेगळी तंत्र Girish Chaudhary, November 12, 2023November 12, 2023 जलरंग वापरताना अनेकदा एखादी पांढऱ्या रंगाची वस्तू उदा. महामार्ग वरचा मैलाचा दगड, स्वच्छ सूर्यप्रकाश असतानां आकाशातील ढग किंवा पाण्यावर पडलेला प्रकाश दाखवण्यासाठी कागदाचा पांढरा रंग तसाच सोडावा लागतो. अश्यावेळी चित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. नेमका तेवढा कागदाचा भाग पांढरा ठेवून बाकीच्या कागदावर जलरंगाचे ओघळ सांभाळणे ऐक कौशल्य आहे. असे केल्याने चित्रामध्ये चांगला उठाव येतो. मात्र कधी कधी हा पंधरा कागद सोडणे खूप अवघड जाते. अश्यावेळी पूर्वनियोजन करून मास्किंग टॅप , मास्किंग फ्लुइड किंवा अगदी मेणबत्ती वापरून सुध्दा अश्या प्रकारचा भास निर्माण करता येतो. शेजारील चित्रात पाऊस दाखविण्यासाठी मी रंगकाम सुरु करण्याआधी मेणबत्ती चा वापर केला. येथे मला रंगाचा थोडाच विरोधाभास अपेक्षित होता. खिडकीच्या चित्रामध्ये मात्र वरील भागात कमानीसाठी कागदाचा पांढरा रंग सोडला आहे. अश्याप्रकारे वेगवेगळ्या चित्रात वेगवेगळी तंत्र वापरावी लागतात . यामुळे जलरंगात चित्र करणे काहीसे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. सततच्या सरावाने हे शक्य होते . Uncategorized Techniquewatercolor
Realistic Portrait ( वास्तववादी पोट्रेट / व्यक्तिचित्रे ) November 10, 2023November 10, 2023 खूप वर्षापूर्वी जेव्हा कॅमेराचा शोध किंवा तयार झाला नव्हता तेव्हा राजे, महाराजे, प्रथितयश व्यक्ती स्वतःचे… Read More