हा खूप भारी चित्र काढतो, एकदम हुबेहूब Girish Chaudhary, October 17, 2023October 30, 2023 हे वाक्य अनेक पालक अनेकदा मुलासमोर म्हणतांना दिसतात . यात पालकांनी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. हुबेहूब चित्र काढणे म्हणजेच चित्रकला असा मूलाच समज होण्याची शक्यता खूप आहे. मनातील भाव कागदावर उतरवणे, व्यक्त होणे ही सुद्धा चित्रकला आहे . वयाच्या ६ वर्षेपासून काही मुले फोटो पाहून चित्रे काढायला सुरूवात करतात . ज्याचे हात आणि डोळे याचे समनव्य चांगले असते ती मुले अगदी हुबेहूब चित्रे काढतात . हे साधारण ६ ते ९ महिने करून पुढे जाणे अपेक्षित आहे. चित्रकलेमध्ये हात आणि डोळे याचा समनव्य असणे प्राथमिक पातळीवर गरजेचे आहे. पालकांनी मुलाचा हा गुण चित्रकले बरोबर दैनंदिन कामात सुद्दा वापरावा. मुलाला चित्रकला साठी पेन्सिल बरोबर ऑइल पेस्टल , पोस्टर कलर , वॉटर कलर अशी वेगवेगळी माध्यमे सुध्दा दयावी . यामुळे तो फक्त पेन्सिल शेडींगमध्ये न अडकता रंग संगती, विविध माध्यम हाताळणी यामध्ये सुध्दा पारंगत होईल. Children Same to Same
चित्रकला कधीपासून सुरु करायची November 28, 2023 चित्रकला कधीपासून सुरु करायची यावर मोठ्या चित्रकाराची विविध विचार, मत आहे. कला मग ती कोणतीही… Read More
रंगभरण पुस्तके (Colouring book) November 2, 2023November 10, 2023 लहान मुलांना भेटवस्तू किंवा वाढदिवसाला हमखास भेट मिळालेले एक पुस्तक म्हणजे रंगभरण पुस्तक. यामध्ये कार्टून,… Read More
Portrait & Landscape (पोट्रेट व लँड्स्केप) October 13, 2023October 30, 2023 माझे एकदा समूह चित्रप्रदर्शन भरले होते. मी व माझे सहकारी मित्र प्रदर्शनच्या खोलीमध्ये चित्रांविषयी चर्चा… Read More
मस्त, खूप वेगळा विचार.. नाहीतर tradditionaly हुबेहूब नक्कल म्हणजे चित्र असे डोक्यात होते.. पण आता वेगळ्या विचाराने प्रयत्न करेन.. धन्यवाद.