Realistic Portrait ( वास्तववादी पोट्रेट / व्यक्तिचित्रे ) Girish Chaudhary, November 10, 2023November 10, 2023 खूप वर्षापूर्वी जेव्हा कॅमेराचा शोध किंवा तयार झाला नव्हता तेव्हा राजे, महाराजे, प्रथितयश व्यक्ती स्वतःचे व आपल्या परिवाराचे फोटो काढतो तसे हुबेहूब चित्र ऑइलकलरमध्ये चित्रकाराकडून काढून घेत. हि चित्रे भरजरी पोशाख, मागे राजवाडा अथवा खूप महाग, दुर्मिळ वस्तू यांची मांडणी करून काढली जायची. या माध्यमातून स्वतः ची ओळख निर्माण करणे , श्रीमंती प्रदर्शन, खानदानीपणा दाखवणे यासाठी मोठ्या प्रमाणात पोट्रेट / व्यक्तिचित्रे काढली गेली असावित. याप्रकारचे वास्तववादी चित्रणास भारताआधी युरोप खंडांत सुरुवात झाली होती यामुळे याचे बीज इंग्रजांनी भारतात आणले असे वाटते. भारतामध्ये १६ ,१७ शतकापर्यत मुघल चित्रकला, लघु चित्रकला ( miniature ) मोठ्या प्रमाणात आढळून येते. यातही व्यक्तीचित्र हा विषय होता मात्र ती वास्तववादी अजिबात नव्हती. आजही २०० वर्ष नंतरही वास्तववादी चित्रे, पोट्रेट / व्यक्तिचित्रे म्हणजे उत्तम चित्रकला असा भाव समाजात आहे, हा इंग्रजांचा प्रभाव बदलण्यासाठी आपण भारताचा चित्रकलेचा इतिहास जाणीवपूर्वक पाहणे, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे Uncategorized Oil ColorRealistic Portrait
जलरंग – वेगवेगळी तंत्र November 12, 2023November 12, 2023 जलरंग वापरताना अनेकदा एखादी पांढऱ्या रंगाची वस्तू उदा. महामार्ग वरचा मैलाचा दगड, स्वच्छ सूर्यप्रकाश असतानां… Read More